मित्रांनो जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत असताना, केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) खताच्या किमतीत 150 रुपयांची वाढ होण्याची शक्यता असून, 10-26-26 या खताच्या दरातही 255 ते 275 रुपयांची वाढ झाली आहे.
तसेच बीटी बियाण्यांच्या किमतीत 37 रुपयांची वाढ झालेली असून, कीटकनाशकांच्या किमतीतही 5 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरवर्षी शेतीसाठी लागणाऱ्या इनपुट्सचा खर्च वाढत असताना, उत्पादन मात्र त्याच पातळीवर राहिल्याने शेतीचे अर्थशास्त्र बिघडले आहे.
सध्या DAP खताची किंमत प्रति पोती 1350 रुपये असून, ती 150 रुपयांनी वाढवून 1500 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामागे अनुदानात कपात करून थेट दरवाढ करण्यात येत असल्याचे दिसून येते.
गेल्या महिन्याभरात 10-26-26 खताची किंमत 1470 रुपयांवरून 1725 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कापूस, सोयाबीन आणि फळबागांसाठी या खताचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिकच वाढत आहे.
काही खत उत्पादक कंपन्यांकडून दुय्यम दर्जाच्या खतांची विक्री सुरू असून, ती अधिकृत खतांशी लिंक करून विकली जात आहेत. विक्रेत्यांकडून कोणतीही तक्रार न आल्यामुळे कृषी विभागाकडून कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेवटी शेतकऱ्यांनाच त्याचा फटका बसतो.
तत्पूर्वी, 10-26-26 खताच्या दरातच वाढ झाली असली तरी, इतर खतांच्या किमतीतही भविष्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.