मित्रांनो शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. शेत रस्ते, पाणंद, विहिरी आणि घरकुलांसाठी लागणारा मुरूम, काळी माती आणि खडी आता मोफत मिळणार आहे. महसूल व वन विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय (जी.आर.) जारी केला आहे.
कुठल्या कामांसाठी मिळणार मोफत गौण खनिज?
शेत रस्ते / पाणंद रस्ते
शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक असतो. अशा रस्त्यांसाठी लागणारा मुरूम आता शासन मोफत देणार आहे.
विहिरींचे बांधकाम
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी माती किंवा मुरूम मोफत मिळणार आहे.
घरकुल बांधकाम
ग्रामीण भागातील घरकुल बांधणीसाठी लागणाऱ्या मुरूमचा खर्च शेतकऱ्यांना कमी करणार, कारण तो देखील मोफत उपलब्ध होणार आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी योजनेचा लाभ
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. या कामांसाठी लागणारा मुरूम आणि माती मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तलाव, तळी व बंधाऱ्यांतून मिळणारी काळी माती
गाव तलाव, बंधाऱ्यांचे काम करताना जेव्हा काळी माती बाहेर येते, ती देखील शेतकऱ्यांच्या उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी ती मोलाची ठरणार आहे.
वाहतूक खर्च मात्र शेतकऱ्यांचाच
शासन गौण खनिज मोफत देत असले तरी त्याची वाहतूक शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
शेवटची सूचना
ज्यांना अद्याप ५ लाख रुपये किंमतीची सिंचन विहीर मंजूर झालेली नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवता येईल.
शासन निर्णयाची लिंक
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202504031058202019….pdf