शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी , पीक विम्याचे पैसे झाले जमा

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
crop insurance money deposit banks

मित्रांनो राज्य सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1,000 रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना किमान 1,000 रुपये देण्यात यावेत, यासाठी सरकारने विमा कंपन्यांना 10 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.

रब्बी हंगाम 2023-24 साठी भरपाई वितरण

रब्बी हंगाम 2023-24 मध्ये एकूण 87,074 शेतकऱ्यांना 8 कोटी 70 लाख 74 हजार रुपयांची नुकसानभरपाई अपेक्षित होती. त्यापैकी विमा कंपन्यांनी 3 कोटी 96 लाख 61 हजार 242 रुपये वितरित केले. उर्वरित 4 कोटी 74 लाख 12 हजार 758 रुपयांची गरज होती. निधीअभावी केवळ 93 लाख 42 हजार 282 रुपयांचे वाटपच करता आले.

पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी

2019 मध्ये सरकारने आदेश काढून, 1,000 रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळाल्यास उर्वरित रक्कम सरकारकडून देण्यात यावी, असे निर्देश दिले होते. मात्र 2023 पासून ही रक्कम देण्यात आली नव्हती. अखेर, खरीप 2023 आणि रब्बी 2024 च्या हंगामासाठी 3,603 शेतकऱ्यांना 10 कोटी रुपये वितरित करण्यात आले.

पीक विमा योजनेतील अडचणी

राज्यात 2016 पासून पीक विमा योजना लागू आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प भरपाई – काही वेळा फक्त 100 ते 150 रुपये – मिळाल्यामुळे नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने किमान 1,000 रुपयांची भरपाई मिळावी, असा निर्णय घेतला होता.

खरीप 2023 च्या भरपाईची स्थिती

खरीप 2023 मध्ये 2,13,529 शेतकऱ्यांना एकूण 21 कोटी 35 लाख 29 हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली होती. त्यापैकी विमा कंपन्यांनी 12 कोटी 28 लाख 71 हजार 282 रुपये वितरित केले. उर्वरित 9 कोटी 6५ लाख 57 हजार 718 रुपयांची भरपाई शासनाने मंजूर केली.

निधीची मर्यादा आणि पुढील योजना

राज्य सरकारकडे सध्या अपुरा निधी असल्यामुळे संपूर्ण भरपाई एकत्रितपणे देता आली नाही. अधिक निधी मिळावा यासाठी आयुक्त कार्यालयाने शासनाला पत्र पाठवले असून, उपलब्ध निधीच्या मर्यादेमुळे सध्या केवळ काही प्रमाणातच भरपाई वितरित करण्यात आली आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.