मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केली आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
पीकविमा मदतीतून 26 हजार 484 कोटींचा लाभ
याअंतर्गत शेतकऱ्यांना पीकविमा योजनेंतर्गत 26 हजार 484 कोटी रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असून, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल.
अकोला जिल्ह्यात मोठे नुकसान
गेल्या काही महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा आणि मूर्तिजापूर या सात तालुक्यांमध्ये 56 हजार 700 शेतकऱ्यांचे सुमारे 57 हजार 371 हेक्टर शेती क्षेत्र पावसामुळे बाधित झाले. तसेच, 48 शेतकऱ्यांच्या 30 हेक्टर क्षेत्रावरील जमीन वाहून गेली, यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले.
ई-पंचनामा पोर्टलद्वारे मदत वितरण प्रक्रिया सुरू
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरीत करण्यासाठी प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. 21 मार्चपासून तहसील कार्यालयांमार्फत ई-पंचनामा पोर्टल वर शेतकऱ्यांची नावे अपलोड केली जात आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत रक्कम वर्ग केली जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
यासंदर्भात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया गतीमान करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
या आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल. पुढील हंगामासाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, खते आणि अन्य शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.