बँक हॉलिडे ३१ मार्च २०२५: ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार असली तरी हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी ही माहिती वाचा.
३१ मार्च रोजी बँक बंद असतील का?
ईदनिमित्त ३१ मार्चला जवळपास सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील. हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता देशभरातील इतर राज्यांमध्ये बँकिंग सेवा बंद राहतील. तथापि, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी कामकाज करणाऱ्या एजन्सींसाठी बँका सुरू राहतील.
आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस
३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची कामं केली जातात. या दिवशी सर्व सरकारी देयकं, कर आणि वित्तीय नोंदींमध्ये विलंब न होण्यासाठी आरबीआयने सरकारी व्यवहार करणाऱ्या बँकांना कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
३१ मार्च रोजी उपलब्ध असलेल्या सेवा
- सरकारी कर भरणा (आयकर, जीएसटी, सीमा शुल्क, उत्पादन शुल्क)
- पेन्शन आणि सरकारी सबसिडीचे देयक
- सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते
- सरकारी योजनांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार
१ एप्रिल रोजी बँका बंद राहतील
आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे १ एप्रिल रोजी बँका बंद राहतील. मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश यासारख्या काही राज्यांमध्ये बँकिंग सेवा सुरू राहतील.
जर तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ३१ मार्चला बँकेत जाण्यापूर्वी तुमची बँक उघडी आहे की नाही हे तपासून घ्या. या दिवशी बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद असतील, पण सरकारी पैमेंट करणाऱ्या बँका सुरू राहतील. १ एप्रिलपासून आर्थिक वर्षाच्या समाप्तीमुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल, त्यामुळे तुमचं काम आधीच करून घ्या आणि कोणत्याही गैरसोयीला टाळा.