मित्रांनो शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा जलद आणि प्रभावी लाभ मिळावा यासाठी एग्रिस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपूर्ण माहिती, आधारशी संलग्न वैयक्तिक तपशील आणि भू-संदर्भीय डेटा एकत्र करून विशेष शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) प्रदान केला जाणार आहे.
शेतकरी ओळख क्रमांक का आवश्यक आहे?
शेतकरी ओळख क्रमांक नसल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे कठीण होऊ शकते. ही प्रणाली लागू झाल्याने शेतकऱ्यांना खालील गोष्टींमध्ये मोठी सोय होणार आहे.
- पीककर्ज मंजुरी – शेतकऱ्यांना पीककर्ज मिळवणे सुलभ होईल.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी – अनुदान थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
- पीकविमा योजना – शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ अधिक सोपा आणि जलद मिळेल.
- बाजारभाव आणि हमीभाव माहिती – शेतमाल विक्रीसाठी हमीभावासह बाजारभाव सहज कळू शकेल.
- खरेदी नोंदणी प्रक्रिया सुलभ – डिजिटल डेटा उपलब्ध असल्यामुळे नोंदणी आणि मंजुरी प्रक्रियेत वेग येईल.
हे सुद्धा वाचा
नवीन युगातील कृषी व्यवस्थापन
Farmer ID प्रणालीमुळे डिजिटल शेती व्यवस्थापन अधिक मजबूत होईल. कृषी धोरणे अचूकपणे राबवता येतील आणि शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.