तुमचे आधार कार्ड सुरक्षित आहे का ? नसेल तर या प्रकारे करा सुरक्षित

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
aadhar card safe or not safe

मंडळी आधार कार्ड भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आहे. आजकाल त्याचा वापर अनेक विविध कामांसाठी होतो. काही ठिकाणी आधार नंबर आणि काही ठिकाणी आधार कार्डाची फोटो कॉपी दिली जात असते. यामुळे आधार कार्डाचा गैरवापर होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे आधार कार्डचा गैरवापर झाल्यास काय करावं आणि त्यापूर्वी काय दक्षता घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

आधार कार्डचा गैरवापर ऑनलाइन कसा तपासायचा?

1) आधार कार्डचे ऑनलाइन वापर तपासण्यासाठी सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर जा.

2) आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड भरून लॉगिन करा. त्यानंतर लॉगिन विथ OTP पर्यायावर क्लिक करा.

3) तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP येईल. तो टाकून लॉगिन करा.
4) लॉगिन झाल्यानंतर Authentication History या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्ही केलेल्या आधार वापराचा पुनरावलोकन करा. आवश्यक असल्यास, UIDAI वेबसाइटवर जाऊन संशयास्पद हालचालींची तक्रार करा.

आधार कार्ड बायोमेट्रिक्स ऑनलाइन कसे लॉक करावं?

1) https://myaadhaar.uidai.gov.in या साइटवर जा.
2) आधार लॉक/अनलॉक करा या पर्यायावर क्लिक करा.
3) आवश्यक माहिती, जसे की व्हर्च्युअल आयडी, नाव, पिनकोड, कॅप्चा कोड भरा आणि ‘सेंड OTP’ क्लिक करा.
4) तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाका आणि आधार कार्ड लॉक करा.

आधार कार्डच्या गैरवापराची तक्रार कशी करावी?

1) तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाल्याची शंका असल्यास, 1947 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.
2) तुम्ही mailto:[email protected] या ई-मेलवर तक्रार पाठवू शकता.
3) UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन देखील तक्रार करू शकता.

आधार कार्डच्या फोटोकॉपीचा गैरवापर टाळण्यासाठी टिप्स

1) आधार कार्डाच्या फोटोकॉपीवर तुमची सही, तारीख आणि त्याचा वापर करण्याचा उद्देश नोंदवा.
2) मास्क्ड आधार कार्ड म्हणजे त्यातला आधार नंबरचा पहिला भाग लपवलेला असतो. https://myaadhaar.uidai.gov.in वेबसाइटवर जाऊन डाउनलोड आधार कार्ड पर्यायावर क्लिक करा आणि मास्क्ड आधार डाउनलोड करा.

याप्रकारे आधार कार्डाचा गैरवापर टाळण्यास आणि जर तो होण्याचा शंका असल्यास त्वरित तक्रार करण्यास मदत होईल.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.