मंडळी महिला दिनाच्या खास निमित्ताने, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे! फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा मिळून एकूण ₹3,000 अनुदान आज दिनांक 8 मार्च रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. संध्याकाळपर्यंत सर्व लाभार्थींना हा हप्ता मिळेल.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत मिळालेली रक्कम
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत एकूण ₹10,500 जमा करण्यात आले आहेत. आजपासून त्यामध्ये आणखी ₹3,000 वाढ होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या खात्यात रक्कम जमा झाली आहे का, हे तपासणे गरजेचे आहे.
पैसे जमा झाले की नाही, हे कसे तपासाल?
1) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकेकडून पैसे जमा झाल्याचा संदेश (SMS) आलेला आहे का, हे पहा.
2) बँकेच्या मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंगच्या मदतीने तुमचे खाते स्टेटमेंट तपासा.
3) तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी (Customer Care) संपर्क साधून खात्यात रक्कम जमा झाली आहे का, याची माहिती घ्या.
4) ऑनलाइन सुविधा नसेल, तर जवळच्या बँक शाखेत जाऊन तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे खात्री करून घ्या.
भविष्यातील मदत व आश्वासने
महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी महिलांना ₹2,100 देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या योजनेत ₹1,500 प्रति महिना मिळत असून, भविष्यात या रकमेची वाढ केली जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. आपणास ह्या योजनेचा लाभ मिळाल्याची खात्री करून घ्या आणि इतर गरजू महिलांनाही याबाबत माहिती द्या.