मंडळी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे! 2025 साठी पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण 2555 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील हंगामातील प्रलंबित भरपाईही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
पिक विमा भरपाईसंदर्भातील सविस्तर माहिती
राज्य सरकारने आपल्या हिस्स्याची रक्कम दिल्यानंतर शेतकऱ्यांना एकूण 2300 कोटी रुपये मिळणार होते. विमा कंपन्यांनी खरीप 2022 पासून थकवलेले पैसे अद्याप दिले नव्हते. आता राज्य सरकारने आवश्यक अनुदान निधी मंजूर केल्यामुळे खरीप/रब्बी 2022, खरीप 2023-24 आणि खरीप 2024 या हंगामातील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणत्या हंगामासाठी किती भरपाई?
एकूण 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2555 कोटी रुपये जमा होणार आहेत. मागील विविध हंगामांमध्ये विमा भरपाईचा प्रश्न अनिश्चित होता. मात्र, सरकारच्या नवीन निर्णयामुळे खालीलप्रमाणे भरपाई मिळणार आहे.
- खरीप 2022 आणि रब्बी 2022-23 – विमा कंपन्यांनी 110% पेक्षा जास्त भरपाई निश्चित केली होती, परंतु सरकारने निधी मंजूर न केल्यामुळे ती रोखली होती. आता 80:110 च्या सूत्रानुसार संबंधित भरपाई दिली जाणार आहे.
- खरीप 2023 – 181 कोटी रुपये विमा कंपन्यांनी निश्चित केले होते, परंतु निधी मंजूर झाला नव्हता. आता हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- रब्बी 2024 – 110% पेक्षा अधिक म्हणजे 163 कोटी रुपयांची भरपाई निश्चित करण्यात आली होती. आता ती मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
पिक विमा कधी मिळणार?
खरीप 2024 साठी नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग यावर आधारित एकूण 2300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध नसल्यामुळे विमा कंपन्यांनी भरपाई रोखली होती. आता राज्य सरकारने विमा हप्ता भरला असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच ही भरपाई मिळणार आहे.