मंडळी शिक्षणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची योजना सादर करण्यात आली आहे. यशस्वी २५ नावाची ही शिष्यवृत्ती योजना यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अकादमिक स्किल्स एंटरप्रायझेस इनिशिएटिव्ह (YASAEI) अंतर्गत अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) कडून सुरू करण्यात आली आहे. देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या योजनेतून लाभ घेता येईल.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे आहे. यामध्ये ५२०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी २५९३ विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी आणि २६०७ विद्यार्थी उच्च पदवी अभ्यासक्रमासाठी निवडले जातील.
1) शिष्यवृत्तीची रक्कम
- पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५०,००० रुपये अनुदान मिळेल.
- उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ३०,००० रुपये अनुदान मिळेल.
2)अर्ज प्रक्रिया
- इच्छुक विद्यार्थ्यांना एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइटवर १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील.
- संस्थात्मक पातळीवर अर्जांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त होईल.
3) पात्रता निकष
- अर्ज करणारा विद्यार्थी AICTE मान्यताप्राप्त संस्थेतील अभियांत्रिकीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात असावा.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये.
- या शिष्यवृत्तीसाठी फक्त मुख्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पात्रता आहे. दुसऱ्या शाखेतील बदल झाल्यास शिष्यवृत्ती अपात्र ठरवली जाईल.
ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे, जी त्यांना तांत्रिक शिक्षणामध्ये प्रगती साधण्यासाठी मदत करेल.