नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख साहेब यांनी 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी या पावसाचा विचार करून शेतीसंबंधी कामे त्वरित पूर्ण करावीत, विशेषता सोयाबीनसारख्या पिकांची काढणी लवकरात लवकर करावी, अशी सूचना त्यांनी दिली आहे.
मोफत ऑनलाईन राशनकार्ड कसे काढावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांतील पावसाचा प्रभाव पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार, 20 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात, 21 सप्टेंबरला पश्चिम विदर्भात आणि नंतर मराठवाडा, कोकण, खानदेशसह इतर भागांत मुसळधार पाऊस होईल. हा पाऊस सलग तीन दिवस प्रत्येक गावात कोसळेल, ज्यामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना
पावसाळी वातावरणात विजा चमकत असताना झाडाखाली थांबणे टाळावे आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. विजांच्या संख्येत वाढ झाल्याने त्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेअंतर्गत सर्वांना मिळेल रु.2 लाख पर्यंत लाभ , जाणून घ्या हि योजना
लातूर जिल्ह्यातील मांजरा धरण 100% भरण्याची शक्यता आहे, तर बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण आणि हिंगोली जिल्ह्यातील येलदरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज वर्तवला आहे. जायकवाडी धरणात नाशिक परिसरातील पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे पूर येऊ शकतो. नदीकाठच्या लोकांना त्यांच्या मोटारी, पाईप्स आणि कृषी उपकरणे सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानात तातडीने होणारे बदल
हवामानात अचानक काही बदल झाल्यास शेतकऱ्यांना त्वरित सूचित केले जाईल, असेही डख यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीचे नियोजन करावे. मग शेतकरी मित्रांनो आवडली का माहिती आवडल्यास इतरांना नक्की पाठवा.