हवामान अंदाज : हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिले “रेड अलर्ट”

Vaishnavi Raut

By Vaishnavi Raut

Updated on:

Follow Us
weather update red alert

परतीच्या पावसाने जाता जाता बुधवारी मुंबईकरांना जबर दणका दिला. संध्याकाळी वेगवान वाऱ्यांसह कोसळणाऱ्या या पावसाने विद्याविहार, मुलुंड, भांडुप, नाहुर, कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला स्थानकांत पाणी भरले व लोकलची सेवा कोलमडली. ऐन संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. राज्यासह महामुंबई प्रदेशात अतिवृष्टीचे संकट घोंगावत असल्याने गुरुवारी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. मुंबईकरांनीही गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या शेतकऱ्यांना मिळेल मोफत वीज, असा करा अर्ज

दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला. मंगळवारी रात्री उशिरा या पावसाने दिलेला तडाखा फारसा लक्षात आला नाही. विजांच्या कडकडाटात तो पहाटेपर्यंत बरसत राहिला. बुधवारची सकाळही तुरळक सरींमध्येच चिंब होऊन उजाडली.

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 सप्टेंबरनंतर पाऊस पुनरागमन करेल असा इशारा देण्यात आला होता. आता मात्र हा इशारा खरा ठरला आहे. पावसाने सप्टेंबर अखेर चांगला जोर पकडला आहे.

पश्चिम रेल्वे विभागात ५०६६ पदांची मेगा भरती, असा करा अर्ज

बहुतांश भागात जोरदार पावसाने शनिवारी हजेरी लावली होती. पुणे, सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाडा वगळता गुरुवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात मोसमी वारे जोरात वाहत असून त्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळं राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

आज 25 ते 29 सप्टेंबर रोजी पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Vaishnavi Raut

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.