नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज, 22 सप्टेंबर रोजी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. डख यांनी सांगितले की, आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार आपली शेती व्यवस्थापनाची आखणी करावी.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार नाही, यादी झाली जाहीर
आज दिलेल्या अंदाजानुसार, नांदेड आणि लातूर भागात पावसाला सुरुवात झाली आहे, आणि संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही पाऊस सक्रिय होईल. त्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सूचित केले की, काढलेल्या पिकांचे योग्य प्रकारे झाकून संरक्षण करावे, जेणेकरून पावसामुळे नुकसान होणार नाही.
राज्यातील बहुतांश धरणे जवळपास 100% भरली आहेत, आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग होईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात अचानकपणे मोठी घसरण , जाणून घ्या आजचे दर
डख यांनी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची तुलना करत, आजपासून सुरू होणारा पाऊस देखील तसाच तीव्र असण्याची शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी विशेषतः विजांच्या वेळेस काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, आणि विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये, असेही त्यांनी सूचित केले आहे.