नमस्कार पश्चिम बंगाल आणि चेन्नईमध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विशिष्ट हवामानाचा नमुना आढळून येत आहे. त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता असून, लवकरच जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामान बदलामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील काही ठिकाणी पाऊस आणि थंड वातावरणाची स्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी वाढली असून हवामानातही बदल होत आहेत. काही ठिकाणी थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांमध्ये थंडी आणखी वाढू शकते आणि पावसाची शक्यताही आहे.
बंगालच्या उपसागरातील या हवामान बदलामुळे जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगाल आणि चेन्नईमध्ये वाऱ्याचा मोठा नमुना तयार होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्याचा प्रभाव समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांवर विशेषता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांवर जाणवेल.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. पावसानंतर राज्यात थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, आणि नवी मुंबईसारख्या भागात सध्या पहाटे दव पडल्याने वातावरण थंड आहे, तर पुढील दोन दिवसांत या भागांमध्ये थंडी थोडी वाढू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हिवाळा आता चांगलाच सुरू होत असल्याचे दिसत आहे, काही ठिकाणी सकाळच्या वेळेस धुकेही जाणवू शकते.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना
- मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील, त्यामुळे बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण वाढल्याने पिकांचे, फळबागांचे, भाजीपाल्याचे आणि फुलांचे सिंचन आवश्यकतेनुसार करावे.
- रब्बी हंगामासाठी भाजीपाला तणमुक्त ठेवावा आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.