नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत हवामानात बदल दिसून येणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मुंबईत २१ आणि २२ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर, २४ ऑक्टोबरपासून राज्याच्या इतर भागांमध्येही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून, हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मित्रांनो महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राला सध्या कोणत्याही चक्रीवादळाचा धोका नाही. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे की, थायलंडच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आणि अंदमान बेटांच्या उत्तरेकडे तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र २३ ऑक्टोबरला चक्रीवादळात परिवर्तित होऊन ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर २४ ऑक्टोबरला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा कोणताही धोका नाही.
शेतकऱ्यांनी या परिस्थितीची नोंद घ्यावी आणि त्यांच्या शेतीच्या योजना त्यानुसार आखाव्यात.