मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि नागरिकांचे हाल होत आहेत तसेच सोयाबीन आणि इतर पिके काढणीला आल्यानंतर झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे आता पुढील कालावधीमध्ये पाऊस कसा असेल याविषयी हवामान विभागामार्फत अंदाज देण्यात आलेला आहे.
29 सप्टेंबर 2024 पासून पुढे राज्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे परंतु काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडू शकतो. पुढील काही दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी त्या पिकांची योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर भागांमध्ये पावसाची उघडीप बघायला मिळेल. विदर्भ मध्ये तुरळक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो. समुद्रसपाटीच्या 5.8 km उंची वरती चक्रकार वारे वाहत आहेत आणि त्यामुळे वायव्य बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
राजस्थान आणि कच्छच्या भागामधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि गुजरात, पंजाब तसेच हरियाणाच्या काही भागांमधून पाऊस परतला आहे.
महाराष्ट्र मधील पावसावर भाष्य करताना पंजाब डख यांनी 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज दिला आहे. परंतु 30 सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. 6 ऑक्टोबर नंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर 9 ऑक्टोबर पर्यंत राज्यात परत मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी दिला.