Voter List 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. आगामी निवडणुकांसाठी मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडेल.
मतदान करण्यासाठी तुमचं नाव मतदार यादीत असणं अनिवार्य आहे. चला, तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे कसं तपासता येईल हे जाणून घेऊया. (Voter List 2024)
मतदार यादीत नाव तपासणे (Voter List 2024)
पूर्वीच्या निवडणुकांमध्ये तुमचं नाव मतदार यादीत असल्यास, ते अद्यापही यादीत आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचं आहे. कारण निवडणूक आयोग दर निवडणुकीपूर्वी मतदार यादी अद्ययावत करतो, त्यामुळे कधी कधी नाव वगळलं जाऊ शकतं. त्यामुळे मतदानाच्या आधी तुमचं नाव यादीत असल्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे.
मतदार यादी कशी तपासावी?
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांची यादी Voter Service Portal वर उपलब्ध करून दिली आहे. तुमचं नाव यादीत आहे की नाही हे खालील पद्धतीने पाहू शकता:
1) खालील लिंकवर क्लिक करा
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13)
2) आपला जिल्हा, मतदार संघ, आणि भाषा निवडा.
3) निवडलेल्या मतदार संघातली सर्व गावे दाखवली जातील. तुमच्या गावाची यादी निवडून समोरील डाउनलोड बटणावर क्लिक करा आणि यादी डाउनलोड करा.
वरील सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची मतदार यादी तपासू शकता आणि तुमचं नाव आहे की नाही हे पाहू शकता.