नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. ही योजना विशेषता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी आहे. अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते. नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, सिंचनासाठी आवश्यक उपकरणे, सोलर पंप, ठिबक व तुषार सिंचन या सर्व गोष्टींसाठी आर्थिक मदत दिली जाते. महिला शेतकऱ्यांना तसेच वनपट्टा धारक शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
योजनेसाठी पात्रता आणि अटी
1) शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असावा आणि त्याला जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2) शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर कोरडवाहू शेतजमीन असावी.
3) याआधी कोणत्याही शासकीय योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा.
4) आधार कार्ड आणि स्वतःच्या नावावरचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा?
विहीर योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करता येतो. यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तसेच, ऑनलाईन अर्जाची प्रत पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात सादर करता येते.
संपर्कासाठी माहिती
शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी विभाग किंवा पंचायत समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा. योजना सध्या महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी अधिकारी मार्गदर्शन करू शकतात.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सिंचनासाठी आवश्यक साधनसामग्री प्राप्त करावी आणि शेती उत्पादकता वाढवावी.