या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना मिळेल ३ हजार रुपये, असा करा अर्ज

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
vayoshri yojana

नमस्कार मित्रांनो राज्यातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन दर महिन्याला १५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच जेष्ठ नागरिकांसाठी राज्याने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षे किंवा त्यावरील जेष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत तर करेलच, परंतु त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अशक्तपणाशी लढण्यासाठी लागणारी साधने किंवा उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी देखील उपयोगी ठरेल.

RBI चा नवीन नियम ,बँक खात्यात आता फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील ६५ वर्षे किंवा त्यावरील जेष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपये मानधन दिले जाईल. या योजनेचे उद्दिष्ट जेष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे आहे. योजनेत समाविष्ट जेष्ठ नागरिक त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अशक्तपणाशी लढण्यासाठी लागणारी साधने आणि उपचारांचा खर्च करण्यासाठी हे मानधन वापरू शकतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत पात्रता काय आहेत?

1) अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
2) अर्जदाराचे वय ३१ डिसेंबर २०२३ रोजी ६५ वर्षे पूर्ण झालेले असावे.
3) अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असावे.
4) अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
5) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
6) अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या १५०० रुपये पेक्षा जास्त मानधन देणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
7) निवडलेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी ३०% महिला असतील.

राज्य सरकारचा मोठा निर्णय : ३० सप्टेंबर पासून राशनकार्ड बंद होणार

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत लागणारे कागदपत्रे

1) आधार कार्ड
2) राष्ट्रीयकृत बँकेचे खाते
3) २ पासपोर्ट साईज फोटो
4) स्वयंघोषणा पत्र

मित्रानो या पोस्टमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेविषयी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. योजना पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.