मित्रांनो रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना २ लाख रुपये विना-तारण कर्ज मिळणार आहे, ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि साधनसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येतात. पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार, विना-तारण कर्जाची मर्यादा फक्त १.६० लाख रुपये होती, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून कर्ज घेणे भाग पडले होते.
पण आता रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयामुळे या कर्जाची मर्यादा २ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, ज्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
ही घोषणा रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक पतधोरण समितीच्या बैठकीत केली गेली. ६ डिसेंबर २०२४ रोजी गव्हर्नर शशीकांत दास यांनी या निर्णयाची माहिती दिली. यापूर्वी २०१९ पासून विना-तारण कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपये होती, परंतु आता ती २ लाख रुपये करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होईल आणि ते खाजगी सावकारांकडून कर्ज घेण्याऐवजी बँकांकडून कर्ज घेतील. बँकांसाठी सरकारने शेतकऱ्यांना कमी कागदपत्रांच्या आधारावर कर्ज उपलब्ध करावं, अशी सूचना केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे हलके होईल.
शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळवण्यासाठी अनेक वेळा कागदपत्रांच्या अडचणी येतात आणि बँक कर्ज घेण्यास टाळाटाळ होते. यामुळे बरेच शेतकरी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतात, ज्यामुळे जास्त व्याज दरामुळे त्यांना नंतर तणावाचा सामना करावा लागतो. या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक सुलभतेने कर्ज मिळू शकणार आहे.अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक सकारात्मक पाऊल ठरले आहे.