ट्रॅक्टरच्या मदतीने शेती कामात गती प्राप्त होते आणि काम जलद गतीने पूर्ण झाल्यामुळे उत्पन्न वाढवणे शक्य होते परंतु जर नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर त्यासाठी खूपच जास्त पैसे लागतात आणि एवढ्या पैशांची जुळवाजुळव करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90% अनुदान दिले जाते.
कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असतात आणि त्यामध्येच ही ट्रॅक्टर खरेदी योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून हे अनुदान प्रदान केले जाते. परंतु या योजनेमध्ये अनेक अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत.
लाडकी बहीण योजना : पैसे जमा होण्याची तारीख फिक्स , या तारखेला होणार पैसे जमा
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींसाठी ही योजना राबविण्यात येत आहे तसेच सदर शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून या योजनेमध्ये लाभ प्राप्त करू शकतील. म्हणजेच राज्यातील सर्वच नागरिकांना याचा लाभ घेता येणार नाही. या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबत आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची मर्यादा देण्यात आलेली आहे. 9 ते 18 हॉर्स पावर चा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे. या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर तुमचा बचत गट शासकीय, निमशासकीय यंत्रणे कडे नोंदणीकृत असला पाहिजे. या बचत गटामध्ये कमीत कमी दहा सदस्य असावेत आणि अध्यक्ष तसेच सदस्य अनुसूचित जातीचे असावेत.
एसटी महामंडळचा मोठा निर्णय : या नागरिकांना आजपासून मोफत एसटी प्रवास
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना मध्ये सहभाग घेणाऱ्या बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत. मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी दहा टक्के रक्कम बचत गटांना भरावी लागेल. योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी ट्रॅक्टर खरेदीची प्रत जोडावी लागेल तसेच आम्ही यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असे शपथपत्र द्यावे लागेल.