नमस्कार मंडळी जर तुम्ही सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा योग्य काळ आहे. कारण पुढील काही काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात, विशेषता भारतात, सोन्या-चांदीच्या मागणीत मोठी वाढ होते, ज्यामुळे भाव वाढू शकतात. त्यामुळे, आताच सोने खरेदी करून तुम्ही भविष्यातील दरवाढीपासून बचाव करू शकता.
सध्या लग्नसराई आणि दिवाळीचा काळ जवळ येत आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करतात, कारण हिंदू धर्मात या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दसऱ्याच्या दिवशी मुंबईत सोन्याचा दर 77,000 रुपये प्रति तोळा होता, तर दिवाळीपर्यंत हा दर 80,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्याचबरोबर भारतात सणांच्या काळात सोन्याला मोठी मागणी असल्यामुळे भावात वाढ झाली आहे.
यासोबतच चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. वाढती महागाई आणि या दरवाढीमुळे नागरिक चिंतेत आहेत. दसऱ्याच्या दिवशी चांदीच्या दरात 1,000 रुपयांची वाढ झाली होती, आणि सध्या चांदीचा दर 97,000 रुपये प्रति किलो आहे. दिवाळीपर्यंत या दरात अजून वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.