नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.
शेतकऱ्यांसाठी ठिबक अनुदान योजनेचे महत्त्व
शेतामध्ये पिकांना पाणी देण्याची योग्य सोय नसल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येतात. काही वेळा आर्थिक अडचणीमुळे देखील पाण्याची सोय करणे कठीण होते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी शेतीच्या क्षेत्रात अधिक प्रगती करू शकतात.
ठिबक अनुदान योजनेचा लाभ कोणाला?
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत प्रती थेंब अधिक पीक या योजनेद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार आहे.
ठिबक सिंचनाचे फायदे
1) उत्पन्न आणि उत्पादकता वाढते.
2) शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा काटेकोर वापर करता येतो.
3) शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते.
4) तणांच्या वाढीवर नियंत्रण मिळवता येते.
5) सिंचन क्षेत्र वाढवता येते.
अनुदानाचे प्रमाण कसे आहे?
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी (2 हेक्टरपर्यंत)
प्रती थेंब अधिक पीक योजनेतर्गत 55% अनुदान
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत 35% अनुदान
एकूण 90% अनुदान
- 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले शेतकरी
प्रती थेंब अधिक पीक योजनेतर्गत 45% अनुदान
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत 45% अनुदान
एकूण 90% अनुदान
ठिबक अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
1)अधिकृत पोर्टलला भेट द्या https://agridbtworkflow.mahaonline.gov.in/
2) किंवा CSC सेंटरवर जाऊन किंवा स्वतः अर्ज भरा.
3) सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
ठिबक सिंचनामुळे पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन वाढवता येते आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषि कार्यालयात संपर्क साधा.