नमस्कार संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असते. याच अनुषंगाने, महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव स्वाधार योजना आहे, आणि त्याची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 30 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
योजनेचे उद्दिष्ट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली स्वाधार योजना, जिल्ह्याच्या ठिकाणी इयत्ता दहावी व बारावीनंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते. वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. सरकार या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक अनुदान देईल.
योजनेच्या लाभाचे स्वरूप
स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नव-बौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना 51,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे, जी दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. याशिवाय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त 5,000 रुपये, तर इतर अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना 2,000 रुपये अतिरिक्त दिले जातील.
योजनेच्या अटी आणि पात्रता
- अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नव-बौद्ध प्रवर्गातील असावा.
- विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा, स्थानिक महानगरपालिका हद्दीतला नसावा.
- नांदेड महानगरपालिकेपासून 5 किमी अंतराच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
- बारावी किंवा त्यानंतर उच्च शिक्षण घेणारा असावा.
- अभ्यासक्रम पदवी किंवा पदविका स्तराचा असावा आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
- इयत्ता अकरावीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
ही योजना विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे, ज्यामुळे त्यांचे शिक्षणाची गती वाढवता येईल.