नमस्कार मित्रांनो PM विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागिरांसाठी एक महत्त्वाची सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 15,000 रुपयांचे टूलकीट अनुदान तसेच 2 लाख रुपयांपर्यंत अल्पदरात कर्ज उपलब्ध होते. याशिवाय, प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड देखील दिले जाते.
ही योजना खास कौशल्याधारित व्यवसाय करणाऱ्या कारागिरांसाठी तयार करण्यात आली आहे. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिंपी, मूर्तिकार, चर्मकार, धोबी, गवंडी, मासेमारी जाळे बनवणारे असे अनेक कारागीर यासाठी पात्र आहेत.
अनुदान मिळवण्यासाठी प्रथम ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाकडून अर्ज पुढे पाठवला जातो. त्यानंतर लाभार्थ्यांना 5 ते 15 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपये टूलकीट अनुदान आणि प्रशिक्षणादरम्यानचे स्टायपेंड मिळते.
ही योजना बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी असून, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अधिक माहितीसाठी PM विश्वकर्मा योजना अधिकृत वेबसाइट येथे भेट द्यावी.