संपूर्ण देशभरामध्ये सध्या बेरोजगारीचा प्रश्न जोर धरत आहे आणि त्यामुळे देशभरातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळावी असा शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. अशा सर्व परिस्थितीत शासनाकडून एक नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या गाईडलाईन्स पुढील आठवड्यामध्ये लागू केल्या जाऊ शकतात.
कौशल्य विकास विभागामार्फत व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हि योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत १२ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना योग्य ते मानधन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनेसाठी सरकारने ५ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे.
कोण पात्र असेल ?
१. उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा
२. कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने राहील
कोणत्या विद्यार्थ्यांना किती मानधन मिळणार आहे?
१. १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये
२. आय. टी. आय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये
३. पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये
असा करा अर्ज
खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू शकता