मंडळी आजच्या काळात नोकरदार व्यक्तींना पर्सनल लोनसंदर्भात फोन आलेला नाही, असे कदाचित कोणीच म्हणू शकत नाही. गेल्या काही वर्षांत वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महागाईच्या वाढत्या जमान्यात अचानक आर्थिक गरज कधी उभी राहील, याचा काही नेम नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही जड कागदपत्रांशिवाय कर्ज मिळत असल्यास लोकांना ते सोन्याहून पिवळं वाटते. हे कर्ज प्रत्येकासाठी सहज उपलब्ध असते का? विशेषता विद्यार्थ्यांसाठी?
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अचानक पैशाची गरज भासल्यास त्यांना हे कर्ज मिळू शकते का, हा मोठा प्रश्न आहे. कारण कोणतेही कर्ज देण्यापूर्वी बँका तुमची आर्थिक परिस्थिती आणि कर्ज फेडण्याची क्षमता तपासतात.
विद्यार्थ्यांसाठी पर्सनल लोन कसे मिळवावे?
1) कर्ज घेण्यासाठी पालक, नातेवाईक किंवा मित्र गॅरेंटर म्हणून साथ देऊ शकतात.
2) अर्धवेळ काम करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दाखला कर्ज मिळवण्यास उपयुक्त ठरतो.
3) ओळख आणि पत्ता पुरावा तसेच, गॅरेंटरचे आर्थिक दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.
पर्सनल लोनचा उपयोग आणि शैक्षणिक कर्जातील फरक
- पर्सनल लोन — घरभाडे, वैद्यकीय खर्च किंवा कोणत्याही तत्काळ गरजांसाठी घेतले जाते. यामध्ये काहीही गहाण ठेवण्याची गरज नसते.
- ज्युकेशन लोन — हे फक्त शिक्षणाशी संबंधित खर्चांसाठी असते, जसे की कॉलेज फी, पुस्तके, हॉल तिकीट, किंवा अभ्यासाशी संबंधित इतर खर्च.
लोन घेताना घ्यावयाची काळजी
- कर्ज घेताना सर्व अटी आणि नियम व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे आहे.
- फायद्यांबरोबर तोटे देखील समजून घ्या.
- वेळेवर कर्ज फेडण्याचा योग्य प्लॅन तयार करा, अन्यथा आर्थिक दबाव वाढू शकतो.
योग्य नियोजन केल्यास पर्सनल लोन हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. कर्ज घेताना त्याचा उपयोग आणि त्याचे व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे.