संपूर्ण देशभरामध्ये सध्या बेरोजगारीचा प्रश्न जोर धरत आहे आणि त्यामुळे देशभरातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कौशल्य विकास अभियानांतर्गत जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळावी असा शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. अशा सर्व परिस्थितीत शासनाकडून एक नवीन योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेच्या गाईडलाईन्स पुढील आठवड्यामध्ये लागू केल्या जाऊ शकतात.
सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या योजनेचे नाव आहे इंटर्नशिप योजना. इंटरशिप योजनेची घोषणा 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ऑक्टोबर 2024 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय च्या वतीने ही योजना सुरू केली जाणार आहे.
इंटर्नशिप योजनेसाठी शासनाच्या वतीने नवीन पोर्टल सुरू करण्यात येईल त्यामध्ये आवश्यक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतील. पात्र असणाऱ्या उमेदवारांना एकूण 5000 रुपयांचे प्रति महिना स्टायपंड दिले जाईल ज्यामध्ये पाचशे रुपये कंपन्यांच्या सीएसआर डिपार्टमेंट माध्यमातून देण्यात येतील आणि 4500 रुपये सरकारकडून देण्यात येतील.
इंटर्नशिप केलेल्या युवकांना प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम करण्याचा अनुभव मिळेल आणि त्यानंतर त्यांना नोकरी मिळण्यास सोपे जाईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना कंपनीमध्ये कौशल्य विकास तसेच रोजगाराची संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे आणि उमेदवाराचे वय 21 ते 24 वर्ष आहे असे उमेदवार या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतील. सध्या या योजनेमध्ये फॉर्मल डिग्री करणारे आणि नोकरीमध्ये असलेले व्यक्ती भाग घेऊ शकतील.