SSC Mega Bharti : 5 सप्टेंबर 2024 रोजी ssc च्या माध्यमातून कॉन्स्टेबल पदासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आणि या अधिसूचनेमध्ये तब्बल 39 हजार 481 कॉन्स्टेबल पदांची घोषणा करण्यात आलेली आहे. या पदांसाठी कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे त्यामुळे दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
जर तुम्हाला एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 मध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येतील. तसेच या परीक्षेचे पेपर जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.
Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख जाहीर, आजच अर्ज करा
जर तुम्हाला या परीक्षेसाठी आवेदन पाठवायचे असेल तर तुमचे वय 18 ते 23 वर्ष असावे. फक्त भारतातील नागरिकांनाच या परीक्षेसाठी अर्ज दाखल करता येईल. सरकारकडून मान्यता मिळालेला बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पुरुषांची उंची 170 सेंटिमीटर आणि महिलांची उंची 157 सेंटीमीटर असावी.
पुरुषांसाठी एकूण 35 हजार 612 जागा उपलब्ध आहेत तर महिलांसाठी 3869 जागा उपलब्ध आहेत. जर तुम्ही संबंधित कॉन्स्टेबल पदांसाठी आवेदन पाठवले तर तुम्हाला सर्वात प्रथम ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल, त्यानंतर शारीरिक चाचणी होईल आणि या दोन्ही परीक्षा पार पाडल्यावर तुमची वैद्यकीय चाचणी केली जाईल.
E-Pik Vima Grant : खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार ई-पीक विम्याचे अनुदान , पहा जिल्हानिहाय यादी
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि मागील काही काळापासून भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असू शकते कारण यामध्ये बीएसएफ, सीआरएसएफ तसेच इतर सैन्य दलामध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया पार पाडली जात आहे.