नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने सोयाबीन आणि उडीद खरेदीसाठी तीन महिने नाफेड (NAFED) आणि NCCF च्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, आणि बाजारातील सोयाबीनच्या घसरलेल्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत, राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि उडीद खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत, तर NCCF च्या अंतर्गत 7 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र केंद्रे सुरू होणार आहेत. 10 ऑक्टोबरपासून मुग आणि उडीद खरेदीला प्रारंभ होईल, तर सोयाबीनची खरेदी 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांना हमीभावाने आपला माल विकण्यासाठी काही सोप्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. या प्रक्रियेअंतर्गत, शेतकऱ्यांना जवळच्या नाफेड किंवा NCCF खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ७/१२ उतारा, आधार कार्ड, आणि बँक पासबुक या कागदपत्रांची आवश्यकता असेल. नोंदणी झाल्यानंतर, शेतकऱ्यांच्या मोबाईलवर शेतमाल विक्रीची तारीख कळवली जाईल, त्यानुसार शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणावा.
शेतकऱ्यांना सोयाबीन, मुग आणि उडीदाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मार्केट फेडरेशनकडून करण्यात आले आहे.