नमस्कार मित्रांनो देशात सध्या सोयाबीनच्या दराबाबत एक गंभीर समस्या उभी राहिली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकले जात असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा खर्चही काढणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी किमान 6000 रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे, यासाठी मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने पुढील तीन महिने 4892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढवले आहे आणि मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयांमुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे. येत्या हंगामात सोयाबीनचे बाजारभाव 5000 रुपयांपेक्षा अधिक जातील का याचा अंदाज विविध अभ्यासातून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आधारकार्ड धारकांना सूचना : आधारकार्ड धारकांना १ ऑक्टोबर पासून लागू होतील हे नियम
सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सोपा) च्या अहवालानुसार, यावर्षी सोयाबीनचा स्टॉक मागील वर्षाच्या तुलनेत 50% कमी राहण्याची शक्यता आहे. मागील हंगामात 24 लाख टन सोयाबीन शिल्लक होते, मात्र यावर्षी गाळप वाढल्यामुळे स्टॉक कमी झाला आहे. यामुळे, नव्या हंगामात स्टॉक फक्त 11 लाख टनांच्या आसपास राहील, असा सोपाचा अंदाज आहे.
पेरणी वाढली पण उत्पादकता घटण्याची शक्यता
यावर्षी सोयाबीनची पेरणी क्षेत्र वाढले असले तरी, ऑगस्ट-सेप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पेरणी वाढली असली तरी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता या तारखेला होणार जमा, यादी जाहीर
परतीच्या पावसाने नुकसान होण्याची भीती
हवामान खात्याने परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान होण्याचा इशारा दिला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
सरकारने हमीभावाने खरेदी सुरू केल्यावर सोयाबीन बाजाराला स्थिरता येईल आणि खुल्या बाजारात दर वाढतील. शेतकऱ्यांना 6000 रुपये प्रति क्विंटल दर अपेक्षित आहे, यासाठी सरकारला अधिकाधिक खरेदी करावी लागेल. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यास देशातील सोयाबीनचे दरही वाढण्याची शक्यता आहे.