soyabean rate in mp नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्य प्रदेशात सध्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 6000 रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे पडसाद केवळ मध्य प्रदेशातच नव्हे तर राजस्थान आणि विदर्भासह देशभरात अनेक ठिकाणी उमटले आहेत. शेतकरी आपापल्या भागात सोयाबीनच्या योग्य दरांसाठी आवाज उठवत आहेत.
PM Mudra Loan : या योजनेअंतर्गत मिळेल 20 लाखापर्यंत कर्ज , असा करा अर्ज
दरम्यान सोशल मीडियावर, विशेषता व्हॉट्सअप, फेसबुक, आणि इन्स्टाग्रामवर मध्य प्रदेश सरकारच्या नावाने एक फेक पत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पत्रकात असा दावा करण्यात आला आहे की मध्य प्रदेशातील सोयाबीनला 5689 रुपये दर जाहीर झाला आहे. पण मध्य प्रदेश सरकारने तातडीने या दाव्याचे खंडन केले असून, हे पत्रक पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारने हा बनावटी दस्तावेज व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या फेक पत्रकामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेक जण विचारत आहेत की मध्य प्रदेशात जर सोयाबीनला 5789 रुपये दर मिळत असेल, तर महाराष्ट्रात तसा दर का नाही? मात्र, मध्य प्रदेश सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की हा दावा खोटा आहे आणि पत्रकातील माहिती चुकीची आहे.
मोफत ऑनलाईन राशनकार्ड कसे काढावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुम्ही जर सोशल मीडियावर असे कोणतेही पत्रक पाहिले असेल, तर त्यातील माहितीस पूर्णपणे खोटे समजा. या पत्रकावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीची वाट पहा, कारण मध्य प्रदेश सरकारने अशा बनावट पत्रके व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे सूचित केले आहे.