नमस्कार मित्रांनो या लेखात आपण कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी (Kapus Soybean Anudan Labharthi Yadi) ऑनलाईन कशी पाहायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इतर घटकांमुळे कापूस व सोयाबीनच्या दरांमध्ये मोठी घट झाली आहे, ज्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे.
या नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. हे सहाय्य फक्त दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित आहे.
या शेतकऱ्यांनाच मिळेल २७ हजार रुपये, पहा कोणते शेतकरी पात्र आहे
अर्थसहाय्य वितरणाची पद्धत
शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाते. हे सहाय्य फक्त थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिले जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळेल.
कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची पद्धत
1) कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login
2) वेबसाईट उघडल्यानंतर Farmer Search या पर्यायावर क्लिक करा.
3) शेतकरी लॉगिनसाठी आधार क्रमांक टाका आणि Get OTP for Aadhaar Verification वर क्लिक करा.
तुमच्या मोबाइलवर आलेला OTP टाकून लॉगिन व्हेरिफाय करा.
सोयाबीनच्या भावात मोठी वाढ , पहा आजचा सोयाबीन बाजार भाव
4) लॉगिन झाल्यानंतर तुमच्या विभाग, जिल्हा, तालुका, व गाव निवडा आणि सर्च बटणावर क्लिक करा.
या यादीमध्ये तुम्ही शेतकऱ्याचे नाव, सर्वे नंबर, खाता नंबर, पिकाचे नाव आणि पीक क्षेत्र पाहू शकता.
शासन निर्णय आणि आर्थिक सहाय्य
महाराष्ट्र शासनाने 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये, दोन हेक्टरपर्यंत मर्यादित सहाय्य दिले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सुमारे 4,194.68 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, ज्यातील 2,516.80 कोटी रुपये 2024 मध्ये वितरित केले जाणार आहेत.
काही तांत्रिक अडचणी
सध्या काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइटवरून यादी पाहण्यास त्रास होऊ शकतो. काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न केल्यास यादी पाहता येईल. मित्रानो अधिक माहिती आणि अडचणी दूर करण्यासाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.