खुशखबर ! या शेतकऱ्यांचे अनुदान आज झाले जमा, यादीत आपले नाव पहा

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Updated on:

Follow Us
soyabean cotton grant distribution

मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य किंवा अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्याप्रमाणे आज या निधीचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, एका क्लिकवर सुमारे ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आज सुमारे २ हजार ३९८ कोटी ९३ लाख रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी किंवा आधार व बँक खाते जुळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहितीनुसार, २०२३ च्या खरीप हंगामात एकूण ९६ लाख ७८७ खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण ४ हजार १९४ कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस तर सोयाबीन साठी २ हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अनुदान स्वतंत्ररीत्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटी द्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळणे आवश्यक असल्याने यामध्ये काही कालावधी लागला..

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.