नमस्कार मित्रांनो गेल्या हंगामात बाजारभावात झालेल्या घट आणि दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भावांतर योजना जाहीर केली आणि त्यानंतर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला 5000 रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदान वितरणासाठी एक स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आणि शेतकऱ्यांना आधार संबंधित डेटा वापरण्याचे सहमती पत्र आणि अर्ज भरून घेतले.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही शेतकऱ्यांना ईकेवायसी प्रक्रिया पार करावी लागेल. ईकेवायसी पूर्ण झाल्यानंतर, कापूस आणि सोयाबीन अनुदान (5000 रुपये प्रति हेक्टर) थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर) द्वारे जमा केला जाईल.
कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळालं का हे ऑनलाईन कसे तपासावे
कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळालं का ते तपासण्यासाठी, सर्वप्रथम https://scagridbt.mahait.org/FarmerLogin/Login लॉगिन करा. त्यानंतर डिबर्समेंट स्टेट्स या ऑप्शनवर क्लिक करा. येथे आधार क्रमांक, कॅप्चा कोड भरा आणि OTP द्वारे लॉगिन करा. OTP टाकल्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती मोबाईलवर दिसेल, ज्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, किती क्षेत्रासाठी अनुदान मंजूर झालं आहे आणि कोणत्या बँक खात्यात अनुदान जमा झालं आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
आचारसंहितेपुर्वी कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा 100% निधी वितरणास मंजुरी मिळाल्यामुळे, जसजसे शेतकऱ्यांची पात्रता पूर्ण होईल, त्यांना आधार लिंक असलेल्या खात्यात अनुदान जमा होईल. ही माहिती इतर शेतकऱ्यांशी शेअर करा आणि शेतीविषयक महत्त्वाची माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, शेती सल्ला आणि इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.