सावधान ! पैसे भरूनही सोलर पंप मिळणार नाही …….. तर हे काम करा

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Published on:

Follow Us
solar pump yojana farmer

मंडळी शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यास सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रभावीपणे सोलार पंप योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 5% ते 10% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, तर उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना 90% ते 95% पर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो.

महाराष्ट्रात सध्या मागेल त्याला सोलार पंप योजना राबवली जात आहे. पिएम कुसुम, महावितरण आणि मागेल त्याला सोलार पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून पेमेंट करण्याचा पर्याय दिला जातो. पण पेमेंट केल्यानंतर अर्जाची पडताळणी होणार आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी सोलार पंप घेतला असेल, ज्यांच्या नावावर विजेचे कोटेशन असेल, ज्यांच्याकडे सामाईक विहीर किंवा जमीन असेल आणि त्या विहिरीवर वीज कनेक्शन असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

पेमेंट करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या 7/12 उताऱ्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद आहे का, त्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही ना, तसेच त्यांनी पूर्वी सोलार पंप घेतलेला नाही याची खात्री करून घ्यावी.

जर शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर काही कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाला, तर त्यांना पैसे परत मिळण्यास वेळ लागू शकतो. तसेच या रकमेसाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व अटी पूर्ण होत असल्याची खात्री केल्यानंतरच पेमेंट करावे.

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.