मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे, त्यापैकी अनेकांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. पण काही लाभार्थ्यांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत. या शेतकऱ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासता येऊ शकतात.
तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असल्यास, कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल की, कोणत्या वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासायची आणि ती कशी तपासायची.
महत्वाची सूचना — काही शेतकऱ्यांना फसवणूक केली जात आहे. फेक लिंक वापरून त्यांना गोंधळात टाकले जात आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणालाही फसवणूक होऊ नये म्हणून, आम्ही अधिकृत वेबसाईटची लिंक दिली आहे. —https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
पहिली पद्धत — महावितरण वेबसाईटवरून अर्जाची स्थिती तपासणे
1) जर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर अर्ज केला असेल, तर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही थेट महावितरणच्या वेबसाईटवर पाहू शकता.
2) अधिकृत महावितरण वेबसाईटवर जा आणि तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातील:
- पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? – येथे हो किंवा नाही निवडा.
- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान (पीएम कुसुम सोलार) योजनेसाठी नोंदणी केली आहे का? – जर नोंदणी केली असेल तर हो आणि नोंदणी केली नसेल तर नाही निवडा.
3) त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक टाका, जो तुम्हाला MK आयडीसह दिला जातो, आणि शोधा बटणावर क्लिक करा.
4) अर्जाची स्थिती तुमच्यासमोर दिसेल. जर अर्ज मंजूर न झाल्यास, वेटिंग असे दिसेल.
दुसरी पद्धत— अधिकृत वेबसाईटवरून अर्जाची स्थिती तपासणे
1) दुसरी अधिकृत वेबसाईट वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता. या वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी, तुम्हाला ‘एमके आयडी’ आणि पासवर्ड आवश्यक आहे.
2) वेबसाईटवर Beneficiary Login वर क्लिक करा आणि तुमचा एमके आयडी आणि पासवर्ड टाका.
3) लॉगिन केल्यावर, तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.