Smart Ration Card : नमस्कार मित्रांनो भारतात रेशन कार्ड केवळ ओळख आणि रहिवासी पुरावा म्हणूनच महत्त्वाचे नसून, विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी देखील ते अत्यावश्यक आहे. या रेशन कार्डच्या मदतीने तुम्हाला अनेक योजना, जसे की आयुष्मान भारत योजना (५ लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा) मिळवता येतात. महाराष्ट्रातील नागरिकांना या कार्डच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचाही लाभ मिळतो. तसेच या कार्डद्वारे शासकीय धान्यही मिळते.
स्मार्ट रेशन कार्ड प्रणाली
२०१८ पासून महाराष्ट्र शासनाने स्मार्ट रेशन कार्ड (Smart Ration Card) प्रणाली लागू केली आहे. पारंपरिक कागदी रेशन कार्ड जिकिरीचे असू शकते, म्हणून शासनाने डिजिटल स्वरूपातील कार्डचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. हे कार्ड आकाराने पॅन कार्डसारखे असल्याने खिशात सहज ठेवता येते.
स्मार्ट रेशन कार्डचे प्रकार
1) पिवळे रेशन कार्ड : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी.
2) केशरी रेशन कार्ड : वार्षिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांसाठी.
3) शुभ्र रेशन कार्ड : वार्षिक उत्पन्न १ लाख किंवा त्याहून अधिक असलेल्या कुटुंबांसाठी.
स्मार्ट रेशन कार्डसाठी पात्रता निकष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा कमी (१९९७-९८ नुसार) असावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता किंवा जीएसटी भरणारा नसावा.
- कुटुंबाकडे टेलिफोन किंवा चारचाकी वाहन नसावे.
- दोन हेक्टरपेक्षा कमी जमिनीचे मालक असावे.
आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- विजेचे बिल किंवा वास्तव्याचा पुरावा
अर्ज प्रक्रिया
1) https://mahafood.gov.in/ जा.
2) ऑनलाइन एप्लिकेशन वर क्लिक करा.
3) आधार कार्डच्या माध्यमातून लॉगिन करा.
4) कुटुंबाची सर्व माहिती भरून सेव्ह करा.
5) प्रिंट प्रिव्ह्यू पाहून अर्ज सेव्ह करा आणि कार्ड तयार करा.
अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसांतच तुमचे स्मार्ट रेशन कार्ड घरपोच मिळेल. या कार्डवर तुमचा फोटो, मोबाईल क्रमांक, डिजिटल SRC क्रमांक, जिल्हा, पुरवठा विभागाची सही, आणि इतर आवश्यक माहिती समाविष्ट असते.
याप्रमाणे तुम्ही स्मार्ट रेशन कार्डसाठी अर्ज करून आवश्यक सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकता.