मंडळी जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठे बदल झाले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेची लाट आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी या महत्त्वाच्या धातूंची खरेदी करण्यास नागरिक उत्सुक असतात पण आता महागाईचा सामना करावा लागणार आहे.
दिवाळी जवळ येत असल्याने सोने 80,000 रुपयांच्या स्तरावर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, आणि त्यानंतर या दरात 85,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारपेठेत दरात सातत्याने चढउतार होत असल्याने, या सणासुदीच्या काळात ग्राहकांचा खिसा मोठा कमी होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात भयंकर वाढ
सोन्याच्या दरांमध्ये मागील आठवड्यात काही चढउतार पाहायला मिळाला. 15 ऑक्टोबरला सोन्याचा दर 220 रुपयांनी कमी झाला, परंतु 16 ऑक्टोबरला तो 490 रुपयांनी वाढला. 17 ऑक्टोबरला तो पुन्हा 220 रुपयांनी वाढला, तर 18 ऑक्टोबर रोजी 870 रुपयांची महागाई झाली. आज सकाळच्या सत्रात, 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,550 रुपये प्रति दहा ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर 79,130 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चांदीचे दरही वाढले
चांदीच्या दरांमध्येही गेल्या काही दिवसांपासून चढउतार सुरू आहे. पाच ऑक्टोबरला चांदीच्या दरात 2,000 रुपयांची वाढ झाली, तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी 3,000 रुपयांची घसरण झाली. मात्र, 11 ऑक्टोबरला चांदीच्या दरात पुन्हा 2,000 रुपयांची वाढ झाली, आणि 18 ऑक्टोबर रोजी 2,000 रुपयांची अजून वाढ झाली. यामुळे 1 किलो चांदीचा दर 99,000 रुपये झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने या सर्व बदलांचे लक्षात घेऊन खरेदी करण्यापूर्वी चांगला विचार करणे आवश्यक आहे.