भारत सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांपैकी एक योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत फ्री शिलाई मशीन योजना राबवण्यात येते आणि या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना पंधरा दिवसांपर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये महिलांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी महिलांना 500 रुपये दिवसाचा हप्ता देण्यात येतो. फ्री शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपयांचा निधी देण्यात येतो तसेच महिलाला जर व्यवसाय करायचा असेल तर दोन-तीन लाख रुपयांचे कर्ज मिळण्यास शासन मदत करते.
उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, बँकेचा तपशील तसेच इतर काही कागदपत्रांच्या मदतीने या योजनेमध्ये अर्ज सादर केला जातो. जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज सादर करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/ वरून अर्ज सादर करू शकतात.
भारत देशातील 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. महिलेच्या पतीचे उत्पन्न 1 लाख 44,000 पेक्षा कमी असावे आणि त्यासाठी उत्पन्न दाखला सादर करावा लागेल. विधवा त्याचबरोबर अपंग महिला पण या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतील. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी अधिक प्राधान्य दिले जाईल.
मोफत शिलाई मशीन साठी अर्ज सादर केल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल आणि तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले तर आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.