मित्रांनो गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बेघर आणि जमीन नसलेल्या नागरिकांना प्राधान्य देऊन हक्काचे घर देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले असून, लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे देण्यात येणार आहेत.
घरकुल योजनेत बेघरांना विशेष प्राधान्य
राज्यातील गरीब नागरिकांना घराचा लाभ मिळावा यासाठी शासनाने कठोर निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गृहनिर्माण योजनेच्या कामांना गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक नागरिकांना स्वतःच्या मालकीचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय
गरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून ग्रामविकास विभागाने १०० दिवसांत २० लाख घरकुले मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पात्र लाभार्थ्यांची निवड व मंजुरी प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाईल आणि बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, घरकुल लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल. यामुळे लाभार्थी व सामान्य नागरिकांना या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल. तसेच हप्त्यांचे वितरण वेळेत व नियमानुसार होईल याची दक्षता घेतली जाणार आहे.
ही योजना प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवली आहे. लाभार्थ्यांचे काटेकोर सर्वेक्षण केले जाणार असून, गावठाण जमिनीचा उपयोग घरकुल योजनेसाठी केला जाणार आहे. मंजूर घरकुले त्वरित बांधून लाभार्थ्यांना हक्काचे घर देण्यात येणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्येक हप्ता मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे की नाही, याची स्थळ पाहणी केली जाणार आहे. तसेच हप्ते वेळेत मिळतील यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल.