SBI खातेदारांना मिळेल ११,००० रुपये, पहा कोणती योजना आहे

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Updated on:

Follow Us
SBI RD Scheme

नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आकर्षक अशा बचत योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ही योजना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. या योजनेमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खातेधारकांना त्यांच्या खात्यात ११,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम मिळण्याची संधी आहे. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया आणि समजून घेऊया की ही योजना कशा पद्धतीने कार्य करते आणि आपल्याला कशी फायदेशीर ठरू शकते.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही नेहमीच आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आकर्षक आणि फायदेशीर योजना प्रदान करत असते. या योजनांमध्ये बचत खाती, मुदत ठेवी, कर्ज, आणि विमा या सेवांचा यामध्ये समावेश होतो.

आता आपण SBI च्या या नवीन योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही योजना म्हणजे आवर्ती ठेव ज्याला आपण Recurring Deposit (RD) या नावाने ओळखतो आहे. या योजनेअंतर्गत, ग्राहकांना त्यांच्या खात्यात बँकेकडून ११,००० रुपयांपर्यंतची अतिरिक्त रक्कम मिळू शकते. हे कशा प्रकारे मिळते ? चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती.

आवर्ती ठेव ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्हाला खात्यात जमा करावी लागते. ही रक्कम तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार निश्चित केली जाऊ शकते. या योजनेचा कालावधी सामान्यतः किमान ६ महिने ते जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत असू शकतो. या कालावधीत तुम्ही नियमितपणे रक्कम जमा करत राहता आणि त्यावर बँक तुम्हाला आकर्षक प्रमाणात व्याजदर देत असते.

आता आपण पाहूया की या

योजनेद्वारे तुम्ही ११,००० रुपये इतकी रक्कम कशी मिळवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिन्याला १,००० रुपये जमा करण्याचे ठरवले आणि ही योजना ५ वर्षांसाठी निवडली, तर पाच वर्षांच्या शेवटी परिस्थिती खालील प्रकारे असेल

१) एकूण जमा केलेली रक्कम : ६०,००० रुपये (१,००० रुपये x १२ महिने x एकूण कालावधी ५ वर्षे )

२) या रकमेवर मिळणारे व्याज (६.५% वार्षिक दराने) : १०,९८९ रुपये

३) एकूण मिळणारी रक्कम – ७०,९८९ रुपये

याचा अर्थ असा की तुम्ही जमा केलेल्या ६०,००० रुपये इतक्या रकमेवर तुम्हाला जवळपास ११,००० रुपये अतिरिक्त मिळतील. हीच ती ११,००० रुपयांची रक्कम आहे जी स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला देत आहे.

या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ?

१) स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कोणत्याही शाखेत जा किंवा SBI च्या ऑनलाइन बँकिंग पोर्टलवर जाऊन लॉग इन करा.

२) RD खाते उघडण्यासाठीचा अर्ज भरा.

३) तुम्हाला हवी असलेली मासिक रक्कम आणि कालावधी निवडावा.

४) आवश्यक ते दस्तऐवज सादर करा (ओळखपत्र, पत्ता पुरावा, इत्यादी).

५) तुमच्या बचत खात्याशी RD खाते जोडा जेणेकरून दर महिन्याला Automatically रक्कम तुमच्या खात्यातून कमी होत जाईल.

अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आजच आपल्या ग्रुप वर शेअर करा.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.