स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत नागरिकांसाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत असतात आणि जास्तीत जास्त नागरिकांना आर्थिक समृद्धी मिळावी असे या मागचे मुख्य उद्दिष्ट असते. आता स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत एक योजना सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त चारशे दिवस गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
एसबीआयच्या या नवीन योजनेचे नाव आहे अमृत कलश योजना आणि या योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निर्धारित करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या या लेखात आपण या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमची गुंतवणूक करू शकाल आणि त्यामधून अधिक परतावा प्राप्त करू शकाल.
लाडकी बहीण योजना : पैसे जमा होण्याची तारीख फिक्स , या तारखेला होणार पैसे जमा
अमृत कलश योजना एक एफडी योजना आहे यामध्ये तुम्हाला चारशे दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यासाठी एसबीआय कडून तुम्हाला 7.10% व्याजदर देण्यात येईल तसेच जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला 7.60% व्याजदर प्रदान करण्यात येतो. एसबीआय मार्फत करण्यात येणाऱ्या फिक्स डिपॉझिट पावती पेक्षा अमृत कलश योजनेमध्ये 30 बेसिक पॉईंट जास्त व्याजदर प्राप्त होतो.
अमृत कलश एफडी योजनेमध्ये भारतीय तसेच NRI नागरिक सहभाग घेऊ शकतात आणि यामध्ये दोन कोटी रुपयांच्या राशीपर्यंत टर्म डिपॉझिट देण्यात येते परंतु जर ही राशी दोन कोटींपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मासिक, सहामाही किंवा वार्षिक व्याजदर प्रदान करण्यात येतो.
एसटी महामंडळचा मोठा निर्णय : या नागरिकांना आजपासून मोफत एसटी प्रवास
टर्म डिपॉझिट मध्ये तुम्हाला तुमची एफडी एक्सपायर झाल्यानंतर सर्व व्याजदर प्रदान करण्यात येतो आणि ही एकूण राशी टीडीएस कापून देण्यात येते परंतु जर तुम्हाला टीडीएसमध्ये सूट हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी 15G/15H फॉर्म भरून बँकेकडे सबमिट करावे लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अमृत कलश योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या योनो ॲप किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे यामध्ये सहभाग घेऊ शकाल.