SBI Bank News : एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा दिला जातोय. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट उघडले तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करावा लागणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेच्या संपूर्ण देशात शाखा आहेत. यामुळे या बँकेच्या खातेधारकांची संख्या खूप जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत असते.
शिवाय एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देखील बँकेकडून अधिकचा परतावा हा दिला जातो. एवढेच नाही तर जर तुम्ही एसबीआयमध्ये बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा मेंटेन करायची गरज नाही.
म्हणजेच, एसबीआयच्या या प्रकारातील सेविंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीदेखील बँकेकडून कोणतीही पेनल्टी शुल्क वसूल केले जात नाही. इतर बचत खात्यामध्ये ग्राहकांना मिनिमम बॅलन्स मेंटेन करावे लागते. परंतु एसबीआयच्या या बचत खात्यात ग्राहकांना झिरो बॅलन्स ची सुविधा मिळते.
म्हणजे मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तरी कोणतेही चार्जेस ग्राहकांना द्यावे भरावे लागत नाही. खरे तर देशातील इतर सर्व बँकांकडून मिनिमम बँक बॅलन्स मेंटेन करण्यात आले नाही तर अतिरिक्त चार्जेस वसूल करण्यात येतात. मिनिमम बॅलन्स मेंटेन केले नाही तर बँका एक ठराविक रक्कम आपल्या ग्राहकांकडून वसूल करत असतात.
परंतु एसबीआयचे हे सेविंग अकाउंट याला अपवाद ठरते. एवढेच नाही तर अशा प्रकारचे बचत खाते बंद करताना देखील ग्राहकांकडून कोणत्याचं प्रकारचे शुल्क वसूल केले जात नाही आणि खाते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी देखील कोणतेच चार्जेस बँक वसूल करत नाहीत.
याशिवाय या प्रकारचे बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना इतरही काही महत्त्वाच्या सुविधा निशुल्क दिल्या जात आहेत. मोबाईल इंटरनेट बँकिंग सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाते. तसेच डेबिट कार्ड, NEFT/RTGS यांसारख्या माध्यमासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस द्यावे लागत नाहीत.
एका महिन्यात 4 कॅश विड्रॉल सुद्धा मोफत करू शकता. पण हे बचत खाते असेल तर ग्राहकांना चेकबुक साठी मात्र शुल्क द्यावे लागणार आहे. एकंदरीत स्टेट बँक ऑफ इंडिया चे हे सेविंग अकाउंट ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा मोफत देत आहे. त्यामुळे तुम्हाला जर बचत खाते ओपन करायचे असेल तर तुम्ही एसबीआयमध्ये सेविंग अकाउंट उघडू शकता