नमस्कार शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 90% ते 95% अनुदानावर सोलार पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. यामध्ये प्रधानमंत्री कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप योजना तसेच महावितरणच्या माध्यमातून विविध सोलार पंप योजना राबविल्या जातात. राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप देण्याची योजना आखली आहे.
सोलार पंपसाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. महावितरणने पात्र शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंटसाठी मेसेज पाठवले आहेत आणि या प्रक्रियेसाठी 24 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.
ज्या शेतकऱ्यांनी या मुदतीपूर्वी सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंट पूर्ण केले, त्यांना पुढील प्रक्रियेत सहभागी करण्यात आले. जे शेतकरी या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांना वगळून नवीन लाभार्थ्यांना ही संधी दिली जात आहे, ज्यामध्ये सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंटसाठी पर्याय उपलब्ध आहेत.
कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या नवीन लाभार्थ्यांना मंजुरीचे मेसेज येऊ लागले आहेत. पात्र लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर अर्ज मंजुरीचा मेसेज येतो. तसेच, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, हे ऑनलाईन पद्धतीनेही तपासता येते. जर तुम्हाला मेसेज आला असेल तर त्यानुसार सेल्फ सर्वेक्षण आणि पेमेंट करून सोलार पंपाचा लाभ घ्यावा. पण पेमेंट करण्यापूर्वी मेसेजची सत्यता तपासून मगच पेमेंट करावे, ही काळजी घेणे आवश्यक आहे.