नमस्कार शेतकरी मित्रांनो सौर कृषीपंप योजना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये एक महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. त्यांनी विधानसभेत सांगितले की, ज्या भागांमध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे, त्या भागांमध्ये 10 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप बसवण्यास परवानगी दिली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि सुधारणा
यावर्षीच्या योजनेअंतर्गत 10 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र काही भागांमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे तेथे केवळ 3 किंवा 5 अश्वशक्तीच्या पंपांमधून अपेक्षित सिंचन शक्य होत नाही. त्यामुळे अशा भागांमध्ये 7.5 आणि 10 HP क्षमतेचे पंप बसवण्याची मुभा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांकरिता अनुदान दिले जाईल, परंतु त्याहून अधिक क्षमतेसाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून पंप बसवावा लागेल.
पात्रता निकष
1) सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे.
2) शेततलाव, विहीर, बोअरवेल किंवा बारमाही नद्या/नाल्यांच्या जवळ शेती असलेले शेतकरी पात्र असतील.
3) महावितरण विभाग संबंधित क्षेत्रातील पाण्याच्या उपलब्धतेची पडताळणी करेल.
4) ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना – 1 आणि 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चा लाभ घेतलेला नाही, ते अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
1) सौर MTSKPY पोर्टलला भेट द्या.
2) सुविधा टॅबवर क्लिक करून नवीन अर्ज भरा.
3) आपली वैयक्तिक माहिती, पत्ता, शेतीचा तपशील आणि बँक खात्याची माहिती भरा.
4) अर्ज सादर केल्यानंतर पावती मिळेल.
5) कुठलीही अडचण असल्यास संबंधित तालुक्याच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.