मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : या शेतकऱ्यांना मिळेल अखंडित वीज पुरवठा, असा करा अर्ज

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Updated on:

Follow Us
saur krushi vahini yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना : राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना 24 तास लाईट उपलब्ध व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे. दिवसा नियमित लाईट पुरवठा व्हावा यासाठी कुसुम योजना तसेच अन्य योजना सुरू असतानाच शासनाच्या माध्यमातून 2939 एकर जमीन लीजवर घेऊन नवीन योजना सुरू केली जाणार आहे.

E-Pik Vima Grant : खुशखबर ! या शेतकऱ्यांना मिळणार ई-पीक विम्याचे अनुदान , पहा जिल्हानिहाय यादी

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 401 मेगा वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण तीन जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

सध्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि याच सर्व अडचणींचा विचार करून तसेच शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा मिळावा यासाठी नांदेड महावितरणाच्या माध्यमातून हजारो एकर जमीन लिज वरती घेऊन त्यावरती सोलर पॅनल बसवण्याचे काम सुरू झालेले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख जाहीर, आजच अर्ज करा

शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन तसेच कृषी पंपांना आवश्यक असलेल्या वीज पुरवठ्यासाठी ही लाईट वापरली जाणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न काही अंशी संपणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा उपयोग करून नांदेड जिल्ह्यातील 78 ठिकाणी प्रकल्प राबवला जाईल तसेच यामध्ये 68 सब स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यामधून एकूण 2347 एकर जमिनीवरती प्रोजेक्ट उभारला जाईल तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये 592 एकर वरती प्रोजेक्ट उभारला जाईल.

शासन निर्णय पहा

नांदेड बरोबरच हिंगोली जिल्ह्यांमध्ये पण 62 मेगा वॅट चा सोलर प्रकल्प उभारला जाणार आहे आणि यासाठी हिंगोली मध्ये तेरा ठिकाणी सोलर प्लांट उभारले जातील तसेच परभणी जिल्ह्यामध्ये पण 54 मेगा वॅट प्रकल्पाला मान्यता देण्यात आलेली आहे. परभणी मध्ये एकूण 10 सर्व स्टेशनची निर्मिती केली जाईल.

अर्ज असा करा

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.