नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मोफत सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना विनामूल्य सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. या योजनेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत असून अर्ज करण्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
सौर कृषी पंप योजना
राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महावितरणच्या नवीन संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत केवळ 14 दिवसांत 1,22,421 शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या उर्जाविषयक समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी समाधान
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ या समस्या नियमित येत असतात. तसेच, लाईट वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाईटच्या वेळेची वाट न पाहता शेतीसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा करता येईल.
अर्ज कसा करावा?
मित्रानो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या संकेतस्थळावर योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची स्थिती आणि पुढील प्रगतीची माहिती या संकेतस्थळावर दिली जाईल. शेतकऱ्यांसाठी ही योजना एक मोठी संधी असून, त्यातून त्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होईल.