मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिले जातील. या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होईल, कारण त्यांना 95% पर्यंत अनुदान मिळणार आहे. सध्या अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आजच्या लेखात आम्ही या अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणार आहोत.
सौर कृषी पंप योजना – अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्याकडून या योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज त्वरित करावा लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) रेशन कार्ड
3) सातबारा
4) आठ अ
5) पासपोर्ट आकारातील फोटो
6) बँक पासबुक
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची अर्ज प्रक्रिया
1) अर्ज करण्यासाठी महा ऊर्जा (Maha Urja) या वेबसाईटवर जा.
2) वेबसाईटवर आपला अर्ज भरा आणि सबमिट करा.
3) अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने 100% अनुदान मिळेल.
4) अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) वर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान मिळेल, तर ओपन आणि OBC वर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाईल.
5) जर 3 एचपी सौर कृषी पंपाची किंमत तीन लाख रुपये असेल, तर शेतकऱ्यांना केवळ 19,000 रुपयेच भरावे लागतील.
तुम्ही शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन सौर कृषी पंपाची सुविधा मिळवावी, यासाठी अर्ज त्वरित करा.