मंडळी आपण पाहतो की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांना आर्थिक लाभ मिळत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना, आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तीन महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.
डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना 2,000 रुपयांच्या स्वरूपात मिळू शकतो. त्याचप्रमाणे, नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता देखील 2,000 रुपये असेल. याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना यापूर्वी 1,500 रुपये मिळत होते महायुती सरकारने ही रक्कम 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. या तिन्ही योजनांच्या लाभांमुळे डिसेंबर महिन्यात एका कुटुंबाला एकूण 6,100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, आयटीआय किंवा पदविका उत्तीर्ण उमेदवारांना 8,000 रुपये, तर पदवीधर उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीत 10,000 रुपये दिले जात आहेत.
या योजनांमुळे शेतकरी, महिला, आणि युवकांना आर्थिक लाभ मिळत असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत.